अ.पा.क.शेरा कमी करणे

एखाद्या जमीनीवर नावे असलेल्या व्यक्तींपैकी कोणी व्यक्ती कायद्याने अज्ञान (१८ वर्षांपेक्षा लहान) असेल तर तिच्या सोबत अज्ञान पालक कर्ता म्हणून सज्ञान व्यक्तीचे नाव ७/१२ उताऱ्यावर लावण्यात येते. अज्ञान व्यक्तीचे वय १८ पूर्ण झाल्यानंतर अज्ञान पालक कर्ता व्यक्तिचे नाव ७/१२ वरुन कमी करण्यात येते. याला ’अ.पा.क. शेरा कमी करणे ’ असे म्हणतात .
अ.पा.क.शेरा कमी करणे नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे
१. ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/मृत व्यक्तिचे नाव)
२. संपूर्ण नाव
३. मोबाईल नंबर
४. इ-मेल (असल्यास)
५. अज्ञान खातेदाराची जंन्मतारीख
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील )
१. खातेदाराचे वयाचा पुरावा – जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
२. ओळखपत्र :-