बोजा चढविणे अर्ज
डेटा एंन्ट्रीबाबत सूचना : आपल्याला एकाच इंग्रजी कि-बोर्डच्या सहाय्याने इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत माहिती भरता येईल. वारसांची नावे भरणे किंवा नावावरुन खाते शोधणे ह्या फिल्ड मधील नावे देवनागरी लिपीतच असणे आवश्यक आहे. देवनागरी मधे माहिती भरावयाची असेल तर नावाचे इंग्रजी स्पेलींग टाईप करावे आणि नंतर स्पेस बार द्यावा टाईप केलेला इंग्रजी शब्द मराठीत दिसेल. इंग्रजी नाव टाईप केल्यानंतर स्पेस बार देणे अनिवार्य आहे. तसेच नावामध्ये काहीही दुरुस्ती असेल ती स्पेस बार देण्यापूर्वी करावी स्पेसबार दाबल्यानंतर दुरुस्ती करण्याकरीता संपूर्ण शब्द खोडून पुन्हा टाईप करावे लागेल. मराठी नाव भरल्यानंतर त्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग इंग्रजी नावात आपोआप येईल. आपल्याला इंग्रजी नाव पुन्हा टाईप करावे लागणार नाही.
शेतकरी जमिनीवर जे कर्ज घेतात त्याची नोंद गाव न.नं.७/१२ च्या इतर हक्कात घेतली जाते त्याला ’बोजा’ असे म्हणतात. हि नोंद ज्या फेरफाराने होते त्याला ’बोजा चढविणे’ असे म्हणतात . ’बोजा चढविणे’ साठी ऑनलाईन अर्ज नागरिक स्वतः करु शकतात, ग्राम महसूल अधिकारी करु शकतात अथवा ज्या बॅंकेकडून कर्ज घेतले आहे ती बॅंक देखील करु शकते.
बोजा नोंद करण्याकरीता करावयाच्या ऑनलाईन अर्जासाठी खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे
१. ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/ सर्वे नं )
२. अर्जदाराचे संपूर्ण नाव
३. अर्जदाराचा मोबाईल नंबर
४. अर्जदाराचा इ-मेल आय डी (असल्यास)
५. बोजा चढविण्यासाठी बँकेचे पत्र अथवा गहानखताच्या दस्ताची प्रत(गहाणखत बोजा चढविणेसाठी)
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील)
१. बँकेच्या पत्राची प्रत
२. दुय्यम निबंधक यांचेकडील गहाणखताची प्रत (गहाणखत बोजा चढविणेसाठी)
महत्वाच्या बाबी -
१.कागदपत्रे जोडा करताना फाईल प्रकार-PDF आणि फाईल साईझ-300 KB पेक्षा कमी असावी
२.अर्जाची प्रत download करताना अर्जाची प्रत download होत नसल्यास --POP -UP -BLOCK ALWAYS ALLOW करावे
३.प्रत्येक टॅब करुन पुढे जा चे बटन दाबले कि तुमचा अर्ज जेवढा भरला गेलाय तेवढा सेव्ह होतो. कागदपत्रे जोडून झाल्यानंतर तो सबमिट बटन दाबल्यावर पूर्ण सेव्ह होतो. डॅशबोर्डवरील 'Save as Draft' बटनावर क्लिक केल्यास अपूर्ण अर्जांची यादी दिसेल त्यातील योग्य अर्जावर क्लिक करुन तो पूर्ण भरून सबमीट करता येईल.
४.एकदा 'Submit' झालेला अर्ज पुन्हा दुरुस्त करता येणार नाही